Pravin Darekar pudhari photo
मुंबई

Mumbai Cooperative Board Election: मुंबई सहकारी बोर्डावर सहकार पॅनेलचे वर्चस्व; सर्व संचालक बिनविरोध

सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांची संचालकपदी बिनविरोध निवड जाहीर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत या निवडणुकीत प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ टी. कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ च्या सर्व उमेदवारांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

नवनिर्वाचित संचालकांमध्ये प्रवीण यशवंत दरेकर, शिवाजीराव नलावडे,अनिल गजरे,मिलिंद टी.कांबळे अंकुश रामचंद्र जाधव, अमोल श्रीपती खरात, नितीन धोंडीराम बनकर, सतीश दत्ताराम सावर्डेकर, विजय गोविंद जाधव, शंकर काशिनाथ अय्यप्पा, बाळासाहेब दिनकर घाडगे, मिलिंद गोविंद राऊत, श्रीधर विश्वनाथ जगताप, किशोर दत्तात्रय पाटणकर, प्रवीण डिकले, सुरेश विठ्ठल भालेराव, विठ्ठल ज्ञानेश्वर वाळुंज, जयंत लक्ष्मण शिरसिकर, मदन दादासाहेब यादव, अनिषा अ. माजगावकर आणि वर्षा माळी यांचा समावेश आहे.

सकारात्मक संदेश गेला

सहकार क्षेत्रातील एकजूट, परस्पर विश्वास आणि संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.सर्व घटकांना विश्वासात घेऊन मुंबई सहकारी बोर्डाच्या माध्यमातून सहकार चळवळीला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप देऊ, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सहकार चळवळ अधिक सक्षम करणे, सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासदांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणे तसेच बदलत्या काळानुसार सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ प्रयत्नशील राहील असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

या बिनविरोध निवडीबद्दल प्रकाश दरेकर, नगरसेवक तथा अध्यक्ष, मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन लि.; विठ्ठलराव भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि.; सुनील बांबुळकर, अध्यक्ष, मुंबई-कोकण विभागीय मजूर सहकारी संघ यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छाही दिल्या आहेत.

बिनविरोध निवडीमुळे संघर्षाऐवजी समन्वय, स्पर्धेऐवजी सहकार्य आणि संस्थेच्या व्यापक हिताला प्राधान्य दिल्याचा सकारात्मक संदेश गेला
- आ. प्रवीण दरेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT