मुंबई : मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवायचे असल्यास स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेला सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या धरतीवर काम करावे लागेल अशी टिपणी गुरुवारी उच्च न्यायालयाने केली.
कांदूरमार्ग डम्पिंग ग्राउंड मुळे होणारे वायू प्रदूषण आणि इतर तर असा विरोधात कन्नमवार नगर विक्रोळी येथील रहिवासी डॉक्टर अभिजीत राणे त्याने दाखल केलेल्या याची किंवा न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीलिमा गोखले यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली.
यावेळी पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुंबईतील रस्त्यांवरील स्वच्छतेसाठी आणि घनकचरा कमी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व उपायोजनांची माहिती न्यायालयात सादर केली.तसेच पालिका प्रशासन कचरा व्यवस्थापनाबाबत अतिशय गंभीर असल्याचे सांगताना त्याने त्यांनी प्रत्येक वार्डातील स्वतःचे बाबत जनजागृती करण्याची जबाबदारी वार्डातील सर्वोच्च अधिकाऱ्यासह तिथल्या नगरसेवकांवरही सोपवण्यात आली आहे.
नगरसेवक जनतेतून निवडून आलेले आलेले असल्याने त्यांचा थेट जनतेशी संपर्क असतो. मुंबईत रात्रीच्या वेळी हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बाहेरून मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा केला जातो. दिवसभरात हा धनकचरा बंद गाड्या मधून शास्त्रक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड वर नेला जातो.
रस्त्यावर आणि मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेचे फिरत्या अधिकारी आणि वार्डातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवत आहेत. अशी माहिती ऍड.साखरे यांनी न्यायालयाला दिली. त्यावेळी खंडपीठाने पालिका राबवत असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले.
कांजूर डम्पिंग ग्राऊंडमधून येणाऱ्या दुर्गंधीबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारलेली नाही आणि एस वॉर्डातील रस्त्यांवर सर्वत्र कचरा विखुरलेला आहे. असा दावा करताना याचिकाकर्त्याने पुरावा म्हणून छायाचित्रेही न्यायालयात सादर केली
पालिका करत असलेले दावे केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.तुम्ही तुमची व्यवस्था सुधारा, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट इशारा देत अस्वच्छतेबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही खंडपीठाने पालिकेला दिले.
न्यायालय म्हणते
@सर्वसामान्य जनतेची मानसिकता लक्षात घेऊन मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक इमारतींमध्ये जिन्यांमधील कोपऱ्यांवर देवी-देवतांच्या टाईल्स लावलेले कोपरेच स्वच्छ दिसतात. त्यामुळे केवळ जागा स्वच्छ करून उपयोग नाही, तर तिचे सुशोभीकरण झाले पाहिजे.