Jail Pudhari
मुंबई

Municipal Officer Crime Case: लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणाऱ्या साहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला याला कोठडी

मंगळवारी त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला: लग्नाचे अमिष दाखवत एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पालिकेच्या के पूर्व विभागातील सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला याला सोमवारी पार्कसाईट पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

यातील पीडित महिला वास्तूविशारद असून त्यांची ओळख तीन वर्षांपूर्वी एका प्रकल्पाच्या मंजुरीच्या कामादरम्यान शुक्ला यांच्यासोबत झाली होती. शुक्ला यानी आपण विवाहित असल्याचे सांगत, पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचे खोटे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने पीडित महिलेला लग्नाचे अमिष दाखवत अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.

मात्र महिलेने लग्नाबाबत त्याला अनेकदा विचारणा केली असता, तो टाळाटाळ करत असल्याने महिलेने रविवारी याबाबत विक्रोळीच्या पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत शुक्ला याला सोमवारी अटक केली आहे.

मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी अधिक तपासासाठी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

शुक्ला निलंबित होऊ शकतात : आयुक्त

बलात्कार आणि शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांना पालिका प्रशासनाने तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. ते 48 तासापेक्षा जास्त काळ कोठडीत राहिल्यास महापालिकेच्या नियमानुसार त्यांना निलंबित केले जाऊ शकते, असे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT