Rain file photo
मुंबई

Mumbai Rainfall: महामुंबईत पावसाची शतकी खेळी! शहरात साडेसहा टक्के कमी पाऊस

२८ सप्टेंबरपर्यंत मुंबई शहरात १,९५७ मिमी, तर उपनगरात २,४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जुलै महिन्यामध्ये जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने त्यानंतर एकेक रन काढत, कशीबशी शतकी खेळी खेळली आहे. शहर विभागात एकूण वार्षिक पावसाच्या तुलनेत साडेसहा टक्के कमी पाऊस झाला आहे. त्या तुलनेत उपनगरांमध्ये वार्षिक सरासरी पावसापेक्षा ७ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

मुंबईत यंदा सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेकडून या अगोदरच वर्तवण्यात आली होती. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांत कुलाबा वेधशाळेच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात २०९५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.

मात्र २८ सप्टेंबरपर्यंत १,९५७ मिमी पाऊस झाला आहे. उपनगरात सरासरी २३१९ मिमी वार्षिक पाऊस होतो. मात्र यंदा २,४९९ मिमी पाऊस झाला आहे. जून अखेरपासून जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. ३१ जुलैपर्यंत शहरात ७८ टक्के व उपनगरात ८३ टक्के पाऊस झाला होता.

त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत शहर विभागात १५ टक्केच पाऊस झाला. उपनगरामध्ये २४ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये किमान ३५ ते ४० टक्के पाऊस होणे अपेक्षित असते. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत शहरात ३२६ मिमी, तर उपनगरांत सरासरी ६०० मिमी इतका पाऊस झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT