बुलेट ट्रेन प्रकल्पातील दुसऱ्या टीबीएमच्या जुळणीला सुरुवात pudhari photo
मुंबई

Mumbai bullet train : बुलेट ट्रेन प्रकल्पातील दुसऱ्या टीबीएमच्या जुळणीला सुरुवात

जमिनीपासून सुमारे 39 मीटर खोलीवर हे टीबीएम तयार करण्यात येत असून ते सावलीहून विक्रोळीच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुंबईतील दुसऱ्या टीबीएमच्या जुळणीला घणसोलीजवळ सावली येथे सुरुवात करण्यात आली आहे. जमिनीपासून सुमारे 39 मीटर खोलीवर हे टीबीएम तयार करण्यात येत असून ते सावलीहून विक्रोळीच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहे.

शनिवारी 190 मेट्रिक टन वजनाचा गॅन्ट्री खाली उतरवण्यात आला. याची लांबी 18 मीटर, रुंदी 10 मीटर आणि उंची 9 मीटर आहे. दोन्ही टीबीएममध्ये मिळून एकूण 4 गॅन्ट्री असतील जे मुख्य शिल्ड असेंब्ली आणि कटरहेडला जोडले जातील. हे गॅन्ट्री टीबीएमसोबत पूर्ण उत्खनन झालेल्या बोगद्यामध्ये पुढे जात राहतील आणि उत्खनन, वॉटरप्रूफिंग, टनेल लाइनिंग सेगमेंट बसवणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी उपयुक्त ठरतील. या टीबीएमद्वारे प्रारंभिक उत्खनन जुलैमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पातील पहिल्या टीबीएमच्या जुळणीला गुरुवारी विक्रोळी येथे सुरुवात झाली. बुलेट ट्रेनसाठी सिंगल ट्यूब टनेल बांधण्यात येत असून त्याचा व्यास 13.1 मीटर असेल. हे बोगदे जमिनीपासून 25 ते 57 मीटर खोलवर आहेत. सर्वाधिक खोल बांधकाम हे 114 मीटर पारसिक टेकडीच्या खाली आहे.

बीकेसी आणि शिळफाटादरम्यान 21 किमी लांबीचा बोगदा बांधला जात आहे. यात भारतातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचा समावेश आहे. ठाणे खाडीखाली 7 किमीचा हा बोगदा असेल. एकूण 21 किमीपैकी 5 किमी भुयारीकरण एनएटीएम पद्धतीने करण्यात आले असून उर्वरित 16 किमी टीबीएम वापरून केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT