Mumbai BMW viral video File Photo
मुंबई

Mumbai BMW viral video: गाडी थांबव... ट्रॅफिक पोलीस ओरडत होता, तरीही थांबवली नाही; मुंबईत BMW चालवणाऱ्या महिलेचा VIDEO व्हायरल

मुंबईतून बीएमडब्ल्यू कारचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

मोहन कारंडे

Mumbai BMW viral video:

मुंबई: मुंबईतून बीएमडब्ल्यू कारचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. वाहतूक पोलिसांच्या वारंवार इशाऱ्यानंतरही एका महिला कार चालकाने आपली महागडी बीएमडब्ल्यू गाडी न थांबवता पुढे नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बीएमडब्ल्यू कारने रस्त्यावरून जाताना एका स्कूटीला आणि अन्य एका कारला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतरही कार न थांबवता चालक महिला घटनास्थळावरून निघून गेली. पुढे वाहतूक पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने पोलिसांच्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि गाडी वेगात पुढे नेली.

सोशल मीडियावर संताप

या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला असून, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या आदेशाला न जुमानता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या महिला चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय होते आणि वाहतूक पोलिसांनी या महिला चालकावर नेमकी काय कारवाई केली, याबाबतची सविस्तर आणि अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हुल्लडबाजीच्या प्रकारामुळे मुंबईत पुन्हा एकदा वाहतूक नियम आणि महिला चालकाच्या मुजोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT