

Mumbai Police Action मुंबईमध्ये एका बाईकवर तिघेजन रात्रीचे फिरत होते, ट्रिपल सिट, विना हल्मेट, सिग्नल तोडणे अशा नियमांची पायमल्ली करत ते फिरत होते. आम्ही मुंबईत असे फिरत आहोत आमचे कोणी काही करु शकत नाही अशा अर्विभावात त्यांनी व्हिडीओ शूट करत सोशल मिडीयावर टाकला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर ॲक्शनमध्ये आले मुंबई पोलिस आणि त्यांनी याची दखल होत या परप्रांतिय तरुण्ाचां चांगलाच समाचार घेत अद्दल घडवली. यातील दोघांना आता पोलिसांनी अटक केली असून एकजण यातील फरार आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या तिसऱ्याचा शोध सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की २६ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री, सुमारे १०:३० वाजता, सीएसएमटी स्टेशनसमोर डी.एन. रोडवर तीन तरुण एका बाईकवर तिघेजण बसून प्रवास करत होते. त्यांच्यापैकी कोणीही हेल्मेट घातले नव्हते. दिलशाद रमजान अली खान (22 वर्ष) निवासी मेहंदी नगर, शिवड़ी, मुंबई, मोहम्मद शाकिर मणियार (19 वर्ष) निवासी हल्लाव पुल, कुर्ला, मुंबई., आमिर खान मूल निवासी कोटिया बाजार, सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश. अशी यसा तिघांची नावे आहेत.
आम्ही वाहतूकीचे नियम तोडत आहोत
व्हिडीओत दिसते की दिलशाद खान बाईक चालवत होता. मध्ये बसलेला आमिर खान आपल्या मोबाईल फोनने सेल्फी व्हिडिओ काढत होता, तर मोहम्मद शाकिर मनियार मागे बसला होता. व्हिडिओमध्ये, ते तिघे तरुण मोठ्याने असे म्हणताना ऐकू येत होते की, "आम्ही तिघे एकाच बाईकवर बसलो आहोत, आमच्याकडे हेल्मेट नाहीत आणि आम्ही वाहतुकीचे सिग्नलही तोडत आहोत,"
व्हिडीओ पाहून मुंबई पोलिस ॲक्शनमध्ये
संबधित युवक रस्त्यावर स्टंट करताना आणि वाहतुकीचे नियम मोडताना दिसले. या व्हिडिओच्या आधारे, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना तत्काळ कारवाई करत दिलशाद रमजान अली खान व मोहम्मद शाकिर मणियार यांना ताब्यात घेतले तर आमिर खान नामक युवक फरार झाला आहे.