मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीवरून सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
BMC Election 2026
मुंबई : महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाले. महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळाले. मात्र यानंतर आता महापौरपदावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र आता याबाबत स्वत: उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीवरून सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली कोणतीही चर्चा झालेली नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा गट भाजपला छुपी मदत करू शकतो. ठाकरे गटाचे नगरसेवक मतदानाच्या वेळी गैरहजर राहून भाजपचा मार्ग मोकळा करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता या चर्चेला चर्चांना पूर्णविराम देत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, "महापौर पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. भाजपला मदत करण्यासाठी नगरसेवक गैरहजर राहणार असल्याच्या माहितीमध्ये तथ्य नाही."
मुंबईच्या महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होऊ शकतो, अशी भूमिका स्वतः उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. शिंदे गटाने सावधगिरी म्हणून त्यांनी आपल्या नगरसेवकांना आलिशान हॉटेलात ठेवलं आहे.तर कोणताही दगाफटका सहन करण्याच्या मन:स्थितीत भाजप नेतृत्व नाही. एकदा गटाची नोंदणी झाली की पक्षांतर बंदीचा कायदा लागू होतो. त्यानंतर सर्व निर्णय प्रशासनाच्या हातात जातात, त्यामुळे कोणालाही सहजासहजी बाजू बदलता येणार नाही.गटनोंदणीनंतर पक्षांतर बंदीच्या कारवाईची सारी सूत्रे प्रशासनाच्या हाती जाणार आहेत.राज्यांच्या प्रमुखांना डावलून कोणते राजकीय धाडस अंगलट येण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळेच इतर पक्षांचे नगरसेवक हॉटेलात असले तरी भाजपचे नगरसेवक मात्र निर्धास्त असल्याकडेही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने लक्ष वेधले.