Mumbai AQI Today Pudhari
मुंबई

Mumbai AQI Today: मुंबईचा AQI पुन्हा शंभरीपार; पवईत प्रदूषणाची सर्वाधिक नोंद

हिरानंदानी गार्डनमध्ये 147 AQI; तापमान तिशीपार, हवामान खात्याचा उष्णतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सलग दोन दिवसांनंतर सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शंभरीपार गेल्याने मुंबईवर पुन्हा एकदा प्रदूषणाचे ढग दाटू लागले आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत एक्यूआय हा प्रत्येकी 94 इतका राहिला. हवा गुणवत्ता निर्देशांक शंभरीच्या आत आल्याने प्रदूषणात कमालीची घट झाली होती. मार्चमध्ये प्रदूषणाचा टक्का कमी राहण्याची शक्यता वाटत होती. मात्र, नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रदूषणात थोडी वाढ झाली. रविवारी 118 इतक्या एक्यूआयची नोंद झाली. गेल्या चार दिवसांमधील हा दुसरा सर्वाधिक हवा गुणवत्ता निर्देशांक ठरला.

पवईत सर्वाधिक प्रदूषण

हिरानंदानी गार्डन, पवई येथे रविवारी (147) सर्वाधिक प्रदूषण आढळून आले. त्यानंतर मराठा कॉलनी, विलेपार्लेचा (139) नंबर लागला. सर्वात कमी प्रदूषण गावदेवीसह (58) कन्नमवार नगर 2, विक्रोळीमध्ये (75) दिसून आले.

कमाल तापमान तिशीपारच

मुंबईतील (20/31 अंश सेल्सिअस) कमाल तापमान विशीमध्ये आणि कमाल तापमान तिशीपार कायम आहे. सांताक्रुझ वेधशाळेमधील ही रविवारची आकडेवारी आहे. सोमवारपासून कमाल तापमानात (20/33 अंश सेल्सिअस) आणखी वाढ होण्याचा अंदाज आयएमडीच्या साप्ताहिक फोरकास्टमध्ये वर्तविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT