मुंबई : मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा कायम असून सलग तिसऱ्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा 150 ते 200 दरम्यान नोंदला गेला आहे. एक्यूआय संकेतस्थळाच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंबईतील सर्वच प्रमुख ठिकाणची हवा आरोग्यास घातक कॅटेगरीमध्ये आहे.
दिवाळी निमित्ताने फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे मुंबईमध्ये वायू प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. 18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवसांत अनुक्रमे 159, 173 आणि 195 इतका एक्यूआय नोंदला गेला. 21 ऑक्टोबरला (166) त्यात थोडी घट झाली तरी प्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही.
मुंबईमध्ये मंगळवारी सर्वाधिक एक्यूआयची नोंद छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 189 इतका होता. पवई (177), शिवाजी नगर, मानखुर्द (176) तसेच नेव्हीनगर, कुलाबा (174) येथील हवासुद्धा आरोग्यास घातक कॅटेगरीमध्ये नोंदली गेली.
एक्यूआय वाढता वाढे
18 ऑक्टोबर 159
19 ऑक्टोबर 173
20 ऑक्टोबर 195