Mumbai Loacl Accident Pudhari
मुंबई

Mumbai Local Accident: लोकल पकडायला गेले अन् एक पाय गमावला; 71 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू

या घटनेमुळे विरा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड: मुलुंड रेल्वे स्थानकात किर्ती विरा (71) या व्यावसायिकाने धावत्या जलद लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आपला एक पाय गमावल्याची घटना 9 एप्रिल रोजी घडली होती. अखेर शनिवारी उपचारादरम्यान या व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलुंड पश्चिमेतील रहिवासी असलेले विरा, क्रॉफर्ड मार्केटमध्ये व्यवसाय करायचे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किर्ती विरा 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास मुलुंडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून जलद लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी लोकलखाली येऊन ते ट्रेनसोबत काही अंतरावर ओढले गेले.

त्यावेळी त्यांचा एक पाय गुडघ्यापासून वेगळा झाला. अपघातानंतर त्यांना तत्काळ मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे काही दिवस उपचार केल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना फोर्टीस रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी त्यांना रुग्णवाहिकेतून फोर्टीस येथे घेऊन जात असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. सायंकाळी 6.23च्या दरम्यान रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विरा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT