मुंबई : भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार एम. एस. धोनी याला बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चा गुडविल ॲम्बेसिडर बनवण्यात आले आहे. ही भारताची पहिली आंतरराष्ट्रीय मल्टिस्टेज प्रोफेशनल रोड सायकलिंग रेस आहे.
19 ते 23 जानेवारीदरम्यान पुण्यात होणारी ही स्पर्धा भारतीय सायकलिंगसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे, कारण ही पुरुषांसाठी देशातील पहिली 2.2 श्रेणीची काँटिनेंटल रोड रेस ठरली आहे.