महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनात पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके सहभागी होणार असल्याची घोषणा 'कॉकरोच जनता पार्टी'ने केली आहे. File Photo.
मुंबई

MPSC Exam Paper Leak : 'एमपीएससी' पेपरफुटी प्रकरणी अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यासाठी आता 'कॉकरोच जनता पार्टी' उतरणार मैदानात

२४ सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास राज्यभर दौरा करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

MPSC Exam Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनात पक्षाचे सदस्य आणि संस्थापक अभिजित दीपके सहभागी होणार असल्याची घोषणा 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) रविवारी (१३ सप्टेंबर २०२६) केली. एमपीएससीच्या परीक्षार्थींनी छत्रपती संभाजीनगरमध्‍ये अभिजित दीपके यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर सीजेपीने ही घोषणा केली आहे.

मागणी मान्‍य न झाल्‍यास CJP करणार राज्यव्यापी दौरा

एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलन पुढे नेले जाईल आणि २४ सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास एमपीएससी परीक्षार्थींशी संवाद साधण्यासाठी राज्यव्यापी दौरा केला जाईल, असे सीजेपीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अभिजित दीपके आणि सीजेपी सदस्य या आंदोलकांमध्ये सहभागी होणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

आम्‍ही एमपीएससी परीक्षार्थींसोबत : अभिजित दीपके

एमपीएससी परीक्षार्थींसोबत झालेल्या बैठकीनंतर दीपके सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट केले आहे की, "सीजेपी आणि मी या लढ्यात एमपीएससी परीक्षार्थींच्या पाठीशी आहोत. एमपीएससीच्या उच्च अधिकाऱ्यांचे राजीनामे होईपर्यंत आम्ही परीक्षार्थींसोबत उभे राहू." दरम्‍यान, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी तसेच विविध परीक्षांमधील कथित पेपर फूट आणि अनियमिततेवर कारवाई करावी, या मागणीसाठी एमपीएससी परीक्षार्थींनी राज्याच्या विविध भागांत आंदोलने करण्‍यात येत आहेत.

पेपरफुटीविरोधात राज्‍यभरात एमपीएससी परीक्षार्थी आक्रमक

एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्‍यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थींनी नुकताच विविध ठिकाणी आक्रोश मोर्चे काढले होते. यामध्‍ये हजारोंच्या संख्ये परीक्षार्थी सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास पुण्यात जंतरमंतरची पुनरावृत्ती करण्याचा थेट इशारा यावेळी देण्‍यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT