मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 25 प्रकराच्या फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेतली. हे सर्व फटाके तपासणीत योग्य असल्याचे आढळून आले आहेत. यानुसार प्रमाणीत केलेले फटाकेच खरेदी करा असेही आवाहन करण्यात आले आहे.
आवाज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासली. जास्तीत जास्त आवाजाची तीव्रता ही 125 डेसिबल ही विहीत मर्यादा यावर्षीच्या मोजमापात पाळली गेली आहे.
सर्वाधिक आवाजाची तीव्रता ही 97.1 डेसिबल इतकी आढळून आली आहे. काही कंपन्यांच्या फटाकांच्या वेष्टनावर ध्वनीची तीव्रता नोंदवली नसल्याचे दिसून आले आहे. या सर्व निरीक्षणाची नोंद डायरेक्टर ऑफ एक्सप्लोजिव्ह यांना पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळी उत्सवात ध्वनीची पातळी राज्यातील एकूण 158 ठिकाणी मोजली जाणार आहे.
ज्या फटाक्यांच्या वेष्टनावर आवाजाची मर्यादा लिहिलेली नसेल किंवा क्यूआर कोड छापलेला नसेल असे फटाके बाजारात विकले जाऊ शकत नाहीत. हे फटाके पोलिसांनी जप्त केले पाहिजेत.सुमायरा अब्दुलाली, आवाज फाऊंडेशन