पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाच्या पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 16 मधील एका रो-हाऊसमधून 2.5 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली, अशा माहितीचे ट्वीट वृत्तसंस्था 'एएनआय'ने त्यांच्या 'एक्स' हँडलवर शेअर केले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला. या छाप्यादरम्यान सापडेलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली.
निवडणूक आयोगाने पुढील कारवाई सुरू केली आहे. तसेच जप्त केलेल्या पैशाचा स्त्रोत आणि मालकी शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेबाबत नेरुळ पोलिस ठाण्य़ात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नेरुळ पोलिस करत आहे. अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल अपेक्षित आहे.