Shraddha Dubey File Photo
मुंबई

Shraddha Dube: मॉडेल श्रद्धा दुबे मुंबईत कुख्यात गँगस्टर झुल्फीला भेटायला यायची; क्लबमध्ये झाली होती भेट, धक्कादायक माहिती

मॉडेल श्रद्धा दुबेचे मुंबईतील 'झेड-गँग'चा म्होरक्या आणि कुख्यात गँगस्टर झुल्फिकार यासिन बेहलिम, जो 'झुल्फी' नावाने ओळखला जातो, त्याच्या टोळीशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे.

मोहन कारंडे

Shraddha Dube

मुंबई: मॉडेल श्रद्धा दुबेचे मुंबईतील 'झेड-गँग'चा म्होरक्या आणि कुख्यात गँगस्टर झुल्फिकार यासिन बेहलिम, जो 'झुल्फी' नावाने ओळखला जातो, त्याच्या टोळीशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. झुल्फिकार हा अमली पदार्थांची तस्करी, अपहरण आणि खंडणी वसुलीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे. पोलीस तपासादरम्यान ही बाब समोर आली असून, स्थानिक पोलीस आणि विशेष पथक आता श्रद्धाचे या गुन्हेगारी जाळ्याशी नेमके काय संबंध आहेत, याचा कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झुल्फिकार यासिन हा मुंबईतील एक कुख्यात गुंड असून त्याचे मुख्य कार्यक्षेत्र मीरा रोड आणि वांद्रे परिसर आहे. तो आपला भाऊ मोहसिन बेहलिम आणि इतर साथीदारांच्या मदतीने खंडणी वसुली, अपहरण आणि अमली पदार्थांची तस्करी करतो. झुल्फिकारचे नाव २०१६ मध्ये सांताक्रूझ येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाशी आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यांशीही जोडले गेले आहे. जुलै २०१६ मध्ये, मुंबई गुन्हे शाखेने झुल्फिकार, त्याचा भाऊ आणि टोळीतील इतर १० सदस्यांना एका बिल्डरकडून २५ लाख रुपयांची खंडणी उकळताना रंगेहात पकडले होते.

क्लबमध्ये झाली होती भेट

मुंबईत सक्रिय असलेली ही 'झेड-गँग' 'डी-कंपनी'च्या धर्तीवर काम करते. या टोळीचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून, ते प्रामुख्याने व्यावसायिक आणि बिल्डरांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे काम करतात. याव्यतिरिक्त, ही टोळी विविध क्लब चालवणे आणि अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करण्याच्या गुन्ह्यांतही गुंतलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि झुल्फिकार यांची पहिली भेट मुंबईतील एका क्लबमध्ये झाली होती.

श्रद्धा झुल्फीला भेटायला मुंबईला यायची

त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि श्रद्धा वारंवार झुल्फीला भेटायला मुंबईला येत होती. पोलीस उपायुक्त अर्पित विजयवर्गीय यांच्या माहितीनुसार, श्रद्धाचा संबंध झुल्फिकारच्या टोळीशी असावा, अशी माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांचे एक पथक तिला तांत्रिक तापासासाठी आणत आहे. या प्रकरणाबाबत तिची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

फ्लॅटच्या घरपट्टीमध्येही अनियमितता उघड

दरम्यान, लखनौमधील 'अवध ग्रीन अपार्टमेंट्स'मधील ज्या फ्लॅटमधून व्यावसायिक शिवा शर्माचा खाली पडून संशयास्पद मृत्यू झाला, तो फ्लॅट शादाब आणि इशाक खान यांच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. शिवाच्या आईने यापूर्वी असा आरोप केला होता की, श्रद्धा तिच्या मुलाला धमकावण्यासाठी माफियांची नावे वापरत असे; आता समोर आलेल्या नवीन माहितीमुळे तिचे आरोप खरे ठण्याची शक्यता आहे.

'अवध ग्रीन अपार्टमेंट्स'मधील ज्या फ्लॅटमध्ये श्रद्धा दुबे राहत होती, तो फ्लॅट शादाब उर्फ ​​इशाक खानच्या नावावर आहे. महानगरपालिकेच्या तपासणीदरम्यान ही बाब समोर आली. तसेच, या फ्लॅटच्या कर (घरपट्टी) आकारणीतही त्रुटी आढळल्या आहेत. तपासात असे दिसून आले की, २०१५ मध्ये घरपट्टी आकारणीसाठी श्रद्धा दुबे यांच्याशी संबंधित दोन स्वतंत्र फ्लॅट्स एकत्र करून एकच युनिट बनवण्यात आले होते. कागदपत्रांनुसार, हे फ्लॅट्स शादाब उर्फ ​​इशाक खान यांच्या नावावर आहेत. आता या फ्लॅट्सची पुन्हा एकदा नव्याने कर आकारणी केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT