मॉडेल रिया अहिरने रोखली पोलीस व्‍हॅन  pudhari photo
मुंबई

Model Riya Ahir : मॉडेल रिया अहिरने रोखली पोलीस व्‍हॅन

शिवाजी पार्क परिसरातील या घटनेचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनसमोर ठामपणे उभे राहत व्हॅन रोखणारी २७ वर्षीय मॉडेल रिया अहिर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवाजी पार्क परिसरातील या घटनेचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तिने रोखलेल्या पोलिस व्हॅनमुळे त्यातील आंदोलकांची अखेर सुटका करण्यात आली.

एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रिया अहिरने सांगितले, ‘मी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पार्ककडे जात होते. त्यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी भरलेली पोलिसांची व्हॅन दिसली. विद्यार्थ्यांना विनाकारण ताब्यात घेतल्याचे मला वाटले आणि घोषणाबाजी ऐकताच मी धावत जाऊन व्हॅनसमोर उभी राहिली.’

तिने सांगितले की, पोलिसांशी माझी यावेळी जोरदार शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी काही अंतरावर नेल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडून देऊ, असे सांगितले. मात्र, तसेच करायचे असेल तर त्यांना तत्काळ का सोडत नाही, असा प्रश्न मी पोलिसांना विचारला. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर पोलिसांकडे नव्हते. असा दावा तिने केला.

'भीती वाटत होती; पण मागे हटले नाही’

रिया म्हणाली, बाहेरून शांत दिसत असले तरी त्या क्षणी मी आतून प्रचंड घाबरलेली होती. तरीही विद्यार्थ्यांना सोडण्यात येईपर्यंत मी व्हॅनसमोरून हलली नाही. अखेर पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आभार मानले. काहींनी माझ्याशी हस्तांदोलन केले, तर काहींनी गमतीने ‘बॅडी’ अशी हाक मारल्याचेही तिने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT