मुंबई महापालिकेत मनसेचाही गटनेता होणार  Pudhari Photo
मुंबई

MNS group leader in BMC : मुंबई महापालिकेत मनसेचाही गटनेता होणार

महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना आपला सहभाग नोंदवता येणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटनेता होणार असल्यामुळे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना आपला सहभाग नोंदवता येणार आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत मनसेला आपले मत मांडता येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु मनसे नगरसेवकांचा गट स्थापन होण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांचे सहा नगरसेवक पळवले. त्यामुळे मनसेला आपला स्वतंत्र गट स्थापन करता आला नाही.

परिणामी महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आले नाही. मात्र यावेळी शिवसेना (उबाठा) यांच्या पाठिंब्यामुळे मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मनसेचा गटनेता होणार आहे. त्यांना मुंबई महापालिका मुख्यालयात पक्ष कार्यालयही मिळणार आहे. महापालिका सभागृहात पक्ष्यांच्या गटनेत्यांना विशेष स्थान आहे. महापालिका सभागृहात एखादी चर्चा होत असताना गटनेत्यांना प्राधान्याने बोलण्याची संधी मिळते. त्यामुळे पक्षाची बाजू ठामपणे मांडता येते.

मुंबई महापालिकेतर्फे एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर सुरुवातीला महापौरांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात येते. या बैठकीत मनसेला स्थान मिळणार आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णयावर आपले मत मांडता येणार आहे.

मोठ्या समित्यांमध्ये स्थान नाही

भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित गट होणार असल्यामुळे मनसेकडे 6 नगरसेवक असूनही त्यांना शिक्षण समिती वगळता अन्य मोठ्या समित्यांमध्ये स्थान मिळणार नाही. विशेष स्थायी, सुधार व बेस्ट समितीवर मनसेचा एकही नगरसेवक सदस्य होणार नाही. विशेष समित्यांवर मात्र त्यांना सदस्य पद मिळणार आहे. स्थायी समिती सदस्य नसल्यामुळे महत्त्वाच्या प्रस्तावावर मनसेला आपले मत मांडता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT