मतदारांचा पत्ता आयुक्त बंगल्यासह शौचालयाचाही pudhari photo
मुंबई

Fake voters issue Navi Mumbai: मतदारांचा पत्ता आयुक्त बंगल्यासह शौचालयाचाही

मनसेने चित्र प्रदर्शनातून बोगस मतदारांचे मांडले २० घोळ, नवी मुंबईकरांकडूनही संताप

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : बोगस मतदारांवरून देशभर राण उठले असताना निवडणूक आयोग फारशी दखल घेताना दिसत नाही. यामुळे मनसेने नवी मुंबईतील बोगस मतदारांचे २० घोळ एका चित्र प्रदर्शनातून नवी मुंबईकरांपुढे पुढे ठेवले आहेत. वाशीत भरवलेल्या या प्रदर्शनात पालिका आयुक्तांच्या निवासस्थानासह सुलभ शौचालयात आणि पामबीच रस्त्यावर राहणाऱ्या मतदारांसह मतदार यादीतील अनेक घोळ समोर आणले आहेत.

मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी हे प्रदर्शन भरवले असून प्रदर्शनाचे शुक्रवारी मनसे नेते अमित ठाकरे यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले, सगळी माहिती पाहून मी थक्क झालो. हे प्रदर्शन म्हणजे प्रत्येक मतदाराच्या गालावर एक चपराक आहे. आपल्याला अजून चुका शोधायच्या आहेत. आणि एवढं लक्षात ठेवा, प्रत्येक खरा मतदार मैदानात उतरला पाहिजे, असे आवाहनही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

या प्रदर्शनाला नवी मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. अनेकजण निवडणूक आयोगाच्या या कारभारावर संताप व्यक्त करत होते. काहींनी तर निवडणूक आयोग लोकशाहीचा हत्या करत असल्याची संतप्त प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त केली. प्रदर्शनासाठी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, विनोद पार्ट, शहर सचिव विलास घोणे, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे आणि पदाधिकरी यांनी मेहनत घेतली.

प्रदर्शनात मांडलेले घोळ

महापालिका आयुक्तांच्या निवासस्थान पत्त्यावरील १२७ मतदार, सुलभ शौचालयासह पामबीच रस्त्यावर राहणारे २५० मतदारांची यादी प्रदर्शनात मांडली आहे. कोपरखैरणेमध्ये एकाच मोबाईल क्रमांकावर २८८ मतदारांची नोंद असून एकाच घरात हिंद, मुस्लिम, खिश्चन अशा विविध धर्मातील लोक राहत असलेले मतदारही आहेत.

सीवूड्समध्ये यादी क्रमांक ३३६ मध्ये करावे गाव तलावाच्या शेजारी मतदार राहत आहेत. तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातील यादी क्रमांक ३०१ मध्ये अनु क्र ९९८ असणाऱ्या एका मतदाराचा पत्ता गजानन महाराज मंदिर आहे. तर ऐरोली विधानसभा मतदारसंघातील यादीत मतदाराचा पत्ता आदर्श हिंदी विद्यालय आहे. असे अनेक चक्रावून टाकणारे प्रकार या प्रदर्शनातून पुराव्यासह मांडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT