मुंबई : मुंबई महापालिकेच्या तोंडावर रविवारी ठाकरे गट व मनसेच्या नेत्यांची बैठक झाली. आजची बैठक आमची शेवटची होती, असे आम्ही मानतो. येत्या एक-दोन दिवसांत युतीसंबंधीची रीतसर घोषणा होईल, अशी माहिती शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी रविवारी दिली.
जागावाटपाच्या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. चर्चा पूर्ण झाली आहे. जागावाटप संपले आहे. कुणी कुठे लढायचे यावर एकमत झाले. कोणतीही अडचण दिसत नाही. ज्या अडचणी होत्या, त्या स्वतः राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून दूर केल्या. सर्व कार्यकर्त्यांचे समाधान होईल याची काळजी घेतली.लभाजपचा पराभव करण्यासाठी आपल्याला सर्व घटक एकत्र घ्यावे लागतील. काँग्रेसचे मन वळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. अजून 72 तास आहेत. पण आमच्यात कोणतीही कटुता नाही. आम्ही त्यांची अडचण समजून घेत आहोत, असेही राऊत म्हणाले.