अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ANI X Photo
मुंबई

नरहरी झिरवळ यांची मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; नेमकं काय घडलं

Narhari Zirwal | धनगर आरक्षणाविरोधात आंंदोलन

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून आज (दि.४) दुपारी १ च्या सुमारास उडी मारली. ते सुरक्षा जाळ्यात अडकले. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान, झिरवळ यांनी आदिवासी आमदारांसोबत तेथेच आंदोलन केले. किरण लहामटे, काशीराम पावरा हेही आमदार आंदोलनात सहभागी झाले आहेत.

धनगर समाजाला आरक्षण देण्य़ाचे आश्वासन राज्य सरकारने पुन्हा एकदा दिले आहे. याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांनी आज मंत्रालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपल्याच सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. मात्र, इमारतीच्या बाहेर सुरक्षा जाळी असल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या समर्थकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. या घटनेनंतर मंत्रालयातच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नरहरी झिरवाळने उडी का मारली?

महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती, आमदार असे महत्त्वाचे पद असतानाही नरहरी झिरवाळ यांनी इमारतीवरून उडी मारून राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलन केले. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) कोट्यातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी निदर्शने केली.

राष्ट्रवादीच्या काही आमदारांनीही  उड्या मारल्या 

दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनीही इमारतीवरून उड्या मारल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, खाली जाळी असलेल्या सुरक्षेमुळे कुणालाही काहीही झाले नाही आणि पोलिसांनी सर्वांना जाळ्यातून बाहेर काढून सुरक्षा कक्षेत ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT