Rape Case file photo
मुंबई

Mira Road Minor Girl Assault Case: १४ वर्षीय मुलीवर सहा नराधमांकडून अत्याचार; दोघे अटकेत

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शोषण

पुढारी वृत्तसेवा

मिरारोड: मिरारोड परिसरातून अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाची संतापजनक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलीचे खासगी अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ गुपचुपपणे काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सहा जणांविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मिरारोड परिसरात आईसोबत राहते आणि शालेय शिक्षण घेत आहे. जुलै २०२६ पासून आतापर्यंत हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आरोपी असिफ याने मुलीचे खासगी अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ गुपचुपपणे काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्याने हे फोटो-व्हिडिओ आपल्या साथीदारांनाही पाठवल्याचा आरोप आहे. यानंतर असलम खान (वय २६) आणि मोनू पटेल (वय २८) यांनीही संबंधित फोटो-व्हिडिओचा गैरवापर करून मुलीला धमकावल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तर शाजिद खान (वय १९) आणि आनस अली (वय २२) यांनी फोन करून फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. रॉकी (वय २३) यानेही मुलीचे फोटो-व्हिडिओ असल्याचे सांगून ते इतरांना दाखवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दोघे अटकेत; डिजिटल पुरावे तपासणीला

या प्रकरणात मोहम्मद अनस अन्सारी (२२) आणि मोहम्मद साजिद खान (२१) यांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. आरोपींच्या मोबाईलमधील डिजिटल पुरावे, सोशल मीडिया व्यवहार आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका तपासली जात आहे.

मिरा भाईंदर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी कारवाईची माहिती दिली. अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्या खासगी छायाचित्रांचा गैरवापर करून लैंगिक शोषण केले आहे. घरात एकटी असताना आरोपीकडून कृत्य घरात मुलगी एकटी असताना आरोपींनी तिचा गैरफायदा घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी बलात्कार, पॉक्सो कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मिरा भाईंदर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी कारवाईची माहिती दिली. अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्या खासगी छायाचित्रांचा गैरवापर करून लैंगिक शोषण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT