MHT CET 2026 Registration Pudhari
मुंबई

MHT CET 2026 Registration: पीसीएम-पीसीबी सीईटीच्या नोंदणीला विशेष मुदतवाढ

विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या मागण्यांचा विचार करून 15 व 16 एप्रिल या दोन दिवसांसाठी विलंब शुल्कासह नोंदणीची अंतिम संधी देण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी सीईटी 2026 अंतर्गत पीसीएम व पीसीबी समूहासाठी दुसऱ्या संधीच्या नोंदणीला विशेष मुदतवाढ जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या मागण्यांचा विचार करून 15 व 16 एप्रिल या दोन दिवसांसाठी विलंब शुल्कासह नोंदणीची अंतिम संधी देण्यात आली आहे.

सध्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या पीसीएम समूहाची पहिली सीईटी परीक्षा सुरू असून पीसीबी समूहाची परीक्षा 21 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या संधीसाठी नोंदणी न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाशी संपर्क साधत प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांची अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप दुसऱ्या संधीसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी या वाढीव कालावधीत तत्काळ अर्ज करावा. मात्र, ज्यांनी आधीच दोन्ही संधींसाठी नोंदणी पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

तसेच या कालावधीत अर्जामध्ये कोणतीही दुरुस्ती (एडिट) सुविधा उपलब्ध नसणार असल्याने अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच राज्य सरकारच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी दोन संधी देण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या संधीसाठी आतापर्यंतची नोंदणी

एमएचटी पीसीएम - 2,96,553

एमएचटी पीसीबी - 1,04,797

एकूण - 4,01,350

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT