MHADA Housing File Photo
मुंबई

MHADA Housing: तटरक्षक दलाकडून म्हाडाच्या १७६ घरांची मागणी

तटरक्षक दलाने म्हाडाच्या प्रतीक्षानगर येथील प्रकल्पातील घरांची मागणी केली असून यासंबंधीचा प्रस्ताव म्हाडाकडून शासनाला पाठवला जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सामान्य नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून आता त्यातील आणखी १७६ घरे कमी होण्याची शक्यता आहे. तटरक्षक दलाने म्हाडाच्या प्रतीक्षानगर येथील प्रकल्पातील घरांची मागणी केली असून यासंबंधीचा प्रस्ताव म्हाडाकडून शासनाला पाठवला जाणार आहे.

शीव प्रतीक्षानगर टप्पा ५ येथे सध्या म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. २०२९पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याने तत्पूर्वीच २०२७ किंवा २०२८च्या सोडतीत येथील घरांचा समावेश केला जाऊ शकतो.

मात्र तटरक्षक दलाने १७६ घरे सेवा निवासासाठी मागितली आहेत. मध्यम उत्पन्न गटाच्या या घरांचे क्षेत्रफळ ७०० ते ८०० चौरस फूट असून किंमत दीड कोटी आहे. तटरक्षक दलाची मागणी पूर्ण झाल्यास म्हाडाला २६४ कोटींचा महसूल मिळू शकतो.

तटरक्षक दलाकडून आलेल्या पत्रावर निर्णय घेण्यापूर्वी म्हाडा शासनाला यासंबंधीचा प्रस्ताव पाठवणार आहे. शासनाने मान्यता दिल्यास सोडतीविनाच ही घरे तटरक्षक दलाला दिली जातील. या प्रकल्पात ४ इमारतींचे काम सुरू असून त्यात मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण २६४ घरे आहेत. त्यातील १७६ घरे तटरक्षक दलाला दिल्यास सोडतीसाठी केवळ ८८ घरे शिल्लक राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT