शिल्लक घरांच्या श्रीमंत अर्जदारांवर म्हाडाची कृपा pudhari photo
मुंबई

Housing affordability MHADA : शिल्लक घरांच्या श्रीमंत अर्जदारांवर म्हाडाची कृपा

9 ते 12 लाख उत्पन्न गटासाठी किमतींत कपात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दरवर्षी शिल्लक राहणारी घरे, अर्जदारांमधील वाढता निरुत्साह आणि यामुळे कमी होत जाणारे म्हाडा सोडतीचे महत्त्व लक्षात घेता मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांच्या किंमतींमध्ये कपात करण्यात आली आहे; मात्र असा निर्णय घेताना म्हाडाने वार्षिक 9 ते 12 लाख कमवणाऱ्या मध्यम उत्पन्न गटावरच कृपा केली आहे.

सध्या मुंबईतील 2 हजार 640 सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. यातील कोट्यवधींच्या किमती पाहता अर्जदारांनी या सोडतीला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. अद्याप 50 हजार अर्जही अनामत रकमेसह दाखल झालेले नाहीत. म्हाडा घरांच्या किंमती कमी करेल, अशी अपेक्षा अर्जदारांना होती; मात्र ती फोल ठरली आहे. म्हाडाने केवळ विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील 1 हजार 221 सदनिकांच्या किमतीत 7.5 टक्के कपात केली आहे.

मुंबई मंडळातर्फे 30 मार्चला जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये संकेत क्रमांक 538, बिल्डींग नं. 2 अ, ब पॉकेट- 2, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील 480 सदनिकांची विक्री किंमत रु. 1 कोटी 45 लाख 58 हजार 307 ते 1 कोटी 47 लाख 97 हजार 992 इतकी आहे. संकेत क्रमांक 539, बिल्डींग नं. 3 अ,ब,क पॉकेट क्र. 2 कन्नमवार नगर, विक्रोळी येथील 741 सदनिकांची विक्री किंमत 1 कोटी 45 लाख 74 हजार 942 ते 1 कोटी 48 लाख 14 हजार अशी नमूद करण्यात आली आहे.

या संकेत क्रमांकांतील सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका 7.5 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. या प्रकल्पातील सदनिकांना प्रती सदनिका 1 वाहन तळ विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही सर्व घरे 9 ते 12 लाख उत्पन्न असलेल्या मध्यम उत्पन्न गटाची आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT