Crime pudhari
मुंबई

Mumbai crime : माटुंगा येथे 29 वर्षांच्या सुरक्षारक्षकाची हत्या

प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : माटुंगा येथे एका 29 वर्षांच्या सुरक्षारक्षकाची त्याच्याच सहकाऱ्याने लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली. अशुकुमार अनिल सिंग असे हत्या झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी अभिषेककुमार सिंग याच्याविरुद्ध माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अशुकुमार हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो सध्या वडाळ्यातील जी. डी. आंबेकर मार्ग, जीडीबी कन्स्ट्रक्शन साईटवर सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. तिथेच अभिषेकुमार हादेखील सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. ते दोघेही त्यांच्या गावच्या एका तरुणीच्या संपर्कात होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे संबंधित तरुणीसोबत संभाषण सुरू होते.

या तरुणीसोबत अशुकुमार हा जास्त वेळ बोलत असल्याने त्याचा अभिषेककुमारच्या मनात राग होता. शनिवारी रात्री उशिरा याच कारणावरून त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादानंतर त्याने अशुकुमारला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. त्यात त्याच्या तोंडाला, डोक्याला, मानेला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली होती.

मारहाणीत तो बेशुद्ध झाला होता. त्याला सायन रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT