अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन विवाहित महिलेची बदनामी File Photo
मुंबई

Mumbai Crime : अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन विवाहित महिलेची बदनामी

साकिनाका येथील घटना; 25 वर्षांच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; गुन्ह्याचा अधिक तपास सुरु

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लिफ्टमध्ये अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन एका विवाहीत महिलेची बदनामीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिच्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षांच्या तरुणाविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा सोसायटीच्या अध्यक्षाचा मुलगा असून त्याने लिफ्टमधील हा व्हिडीओ काढून तो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे उघडकीस आले.

तक्रारदार महिला ही तिच्या पती आणि दोन मुलांसोबत साकिनाका परिसरात राहते. जानेवारी महिन्यांत ती लिफ्टमध्ये एक अज्ञात व्यक्ती तिच्यासोबत होता. या दोघांनी एकमेकांना पाहिले आणि भावनेच्या भरात त्यांनी एकमेकांना किस केले होते. गेल्या आठवड्यात ही महिला मार्केटमध्ये गेली असता तिला काही बायका तिच्याविषयी काहीतरी आक्षेपार्ह बोलत होते. त्यांनी कुठल्या तरी व्हिडीओचा उल्लेख केला होता. यावेळी तिथे तिच्या परिचित एक तरुण होता.

या तरुणाकडे विचारणा केल्यानंतर त्याने तिचा लिफ्टमधील एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिला जानेवारी महिन्यांचा हा प्रसंग आठवला होता. तपासअंती याच सोसायटीच्या अध्यक्षाच्या मुलाने तो व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. त्याचे वडिल सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांच्याकडे सोसायटीच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे ॲक्सेस होते.

त्यांना तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने संपूर्ण इमारतीमध्ये कॅमेरा तपासाचे काम त्यांचा मुलगा पाहत होता. याच दरम्यान त्याच्या निदर्शनास हा व्हिडीओ आला आणि त्याने तो व्हिडीओ व्हायरल केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT