मुंबई : मरिनड्राईव्हच्या समुद्रात उतरलेल्या एका महिलेचा जीव वाचविण्यात मरिनड्राईव्ह पोलिसांना गुरूवारी यश आले.
मरिनड्राईव्हला एक महिला समुद्रात उतरली असून तिला बाहेर काढण्यासाठी मदत हवी आहे असा असा निरोप मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला गुरूवारी दुपारी मिळाला आणि मरिनड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. या महिलेला पाण्यातून सुखरुप बाहेर काढले.
तिच्या पायाला खरचटल्याच्या जखमा झाल्याने तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आले. या महिलेचे नाव सैफी (40) असून ती मालाडची रहिवासी आहे. पोलिसांकडून तिच्या नातेवाईकांचाही शोध घेतला जात असून ती मरिनड्राईव्ह समुद्राजवळ का आली होती? तिने समुद्रात आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याचा तपास सुरु आहे.