मरेवर उद्या रात्रकालीन विशेष मेगाब्लॉक pudhari photo
मुंबई

Mare night mega block : मरेवर उद्या रात्रकालीन विशेष मेगाब्लॉक

भायखळा, सायन रेल्वे स्टेशन पादचारी पुलाच्या गर्डरचे काम; लोकलसेवेवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भायखळा व सायन रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे शनिवार मध्यरात्री 12.30 ते रविवारी पहाटे 4.30 पर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विशष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. भायखळा येथे 4 स्टील गर्डर्स व सायन येथे 40 मीटर स्पॅन मोठ्या क्रेनच्या सहाय्याने बसवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून काही लोकलचा प्रवास अर्ध्यावर संपवण्यात येणार आहे.

असा असणार ब्लॉक

ब्लॉक 1

कधी : 27 सप्टेंबर मध्यरात्री 12.30 ते 28 सप्टेंबर पहाटे 4.30 वाजेपर्यंत

कुठे : अप व डाउन धिम्या व जलद मार्गावर भायखळा आणि परेल दरम्यान

ब्लॉक 2

कधी : रविवार 28 सप्टेंबर मध्यरात्री 1.10 ते पहाटे 4.10 वाजेपर्यंत

कुठे : अप व डाउन धिम्या आणि जलद मार्गावर दादर आणि कुर्ला दरम्यान

उपनगरीय सेवेवर परिणाम

  • दादर येथून रात्री 10.18 वाजता सुटणारी दादर- कुर्ला लोकल रद्द

  • कल्याण येथून रात्री 11.15 वाजता सुटणारी कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द

  • कसारा येथून 10 वाजता सुटणारी कसारा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ठाणे येथे 11.49 वाजता प्रवास संपवण्यात येईल

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 12.24 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे लोकल रद्द

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 4.19 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कसारा लोकल ठाणे येथून 5.14 वाजता प्रवास संपवण्यात येईल.

  • ठाणे येथून पहाटे 4.04 वाजता सुटणारी ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द

या मेल/एक्स्प्रेसवर परिणाम

  • ट्रेन क्रमांक 11020 (भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस) कुर्ला येथे 3.28 ते 4.15 तासांपर्यंत नियंत्रित केली जाईल आणि दादर येथे प्रवास संपवण्यात येईल.

  • ट्रेन क्रमांक 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ठाणे येथे 3.43 ते 4.00 तासांपर्यंत थांबवण्यात येईल आणि दादर येथे प्रवास संपवण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT