Marathi Learning Classes Pudhari
मुंबई

Marathi Learning Classes: चालकांचे मराठी शिकवणी वर्ग ५० दिवसांपासून बंद; वर्गासाठी शासनाला अजूनही मुहूर्त सापडेना

गणेशोत्सवानंतर वर्ग सुरू करण्याचे आश्वासन; ऑक्टोबर सुरू झाला तरी परिवहन विभागाकडून अद्याप मुहूर्त नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारापुरते मराठी शिकवणारे शासनाचे वर्ग गेल्या ५० दिवसांपासून बंद आहेत. आरटीओने नोटिसा बाजवलेल्या चालकांचे या वर्गाकडे डोळे लागले आहेत. गणेशोत्सवानंतर पुन्हा हे वर्ग सुरू केले जाणार होते.

मात्र, ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी अद्याप या 'व्यवहारिक मराठी शिकवणी' वर्गासाठी परिवहन विभागाला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे मराठी शिकायचे कुठे? आणि कारवाई टाळायची कशी ? असे अनेक प्रश्न रिक्षा-टॅक्सी चालकांना पडले आहेत.

परिवहन विभागाकडून अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारापुरते मराठी शिकवणारे वर्ग १५ ऑगस्ट, २०२६ पासून बंद करण्यात आले आहेत. अशात मराठी येत नसलेल्या ४१० रिक्षा टॅक्सी चालकांवर आरटीओने नोटिसा बजावल्या आहेत.

भविष्यात केव्हाही आपल्यावर पुन्हा कारवाईच्या धास्तीने जवळपास २५ हजार ७०७ रिक्षा-टॅक्सी चालकांचे या शिकवणी वर्गाकडे डोळे लागले आहेत. मात्र वर्गच सुरू होत नसल्याने अनेक प्रश्न त्याच्यासमोर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT