मुंबई : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द राज्य सरकारने आझाद मैदानावर दिला असताना या आंदोलकांनी मुंबई सोडताच त्यांच्या विरोधात एक ना अनेक गुन्हे मुंबई पोलिसांनी दाखल केले.
आझाद मैदानात २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे यांचे उपोषण पाच दिवस चालले. या काळात मराठा आंदोलकांकडून मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन करणे, बेकायदेशीर सभा घेणे तसेच अन्य कलमांचे उल्लंघन झाले. त्याबद्दल विविध पोलीस ठाण्यांत नऊहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन, आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, जे. जे मार्ग, डोंगरी, कुलाबा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण नऊ गुन्ह्यांचा समावेश आहे. अज्ञात व्यक्तींविरुद्ध संबंधित गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.