Manikrao Kokate: सर्वोच्च न्यायालयात आज माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे. १९९५ सदनिका घोटाळा प्रकरणी खालच्या कोर्टाने दिलेल्या त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्याविरोधात माणिकराव कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती जॉयमाला बागजी यांनी शिक्षेमध्येच गंभीर तृटी असल्याचे निरीक्षण नोंदवले.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीदरम्यान कोकाटे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई करता येणार नाही. माणिकराव कोकाटे हे आमदार म्हणून राहतील मात्र त्यांना आमदार म्हणून कोणतेही अधिकार असणार नाहीत. त्यांना कोणताही निधी वापरता येणार नाही. तसेच राज्य सभा किंवा विधानसभेत मतदान झालं तर त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही. एकप्रकारे कोकाटे विनाअधिकाराचे नामधारी आमदार असतील.
माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधी सूर्य कांत आणि ज्यॉयमाला बागजी यांच्या बेंचनं माणिकराव कोकाटे यांना सध्या आमदार म्हणून अपात्र करता येणार नाही. कोकाटेंच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती राहील असा निर्णय दिला.
दरम्यान, सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी केली.
त्यावर सर न्यायाधीश सूर्य कांत यांनी या प्रकरणी नोटीस बजावा, दरम्यान याचिकाकर्त्याच्या शिक्षेला स्थगिती राहील. त्यांच्या विधानसभेचे सदस्यत्व रद्द होणार नाही. मात्र या काळात याचिकाकर्त्याला त्याचे आमदार म्हणून कोणतेही अधिकार वापरता येणार नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी घेतली, ज्यात त्यांनी १९९५ च्या फसवणूक प्रकरणात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.
दुसरीकडे न्यायमूर्ती जॉयमाला बागजी यांनी शिक्षेमध्येच एक गंभीर तृटी असल्याचे मत नोंदवले. माणिकराव कोकाटे यांना जरी मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होती तरी त्यांनी माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर करून त्यांना काही अंशी दिलासा दिला होता.
दरम्यान, खालच्या कोर्टाने कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. दरम्यान, कोकाटे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नाशिक पोलीस हे मुंबईतील रूग्णालयात कोकाटेंना अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोहचले होते.