Injection  File Photo
मुंबई

Mumbai news: मालाडमध्ये धक्कादायक घटना: नशेच्या ओव्हरडोसनंतर १७ वर्षीय तरुणाचा तडफडून मृत्यू

मालाड पूर्व येथील अप्पा पाडा परिसरातील बुवासावळी मैदानाजवळ नशेचे इंजेक्शन घेतल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai news

मुंबई : मालाड पूर्व येथील अप्पा पाडा परिसरातील बुवासावळी मैदानाजवळ नशेचे इंजेक्शन घेतल्याने एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (दि. ४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, मैदानातील सार्वजनिक स्वच्छतागृहात काही तरुण नशेचे इंजेक्शन घेत होते. त्यावेळी अमान सोनी या तरुणाला प्रमाणापेक्षा जास्त इंजेक्शन देण्यात आल्याचे समजते. यामुळे अमानची प्रकृती अचानक खालावली. त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे अप्पा पाडा व बुवासावळी मैदान परिसर अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा बनत असल्याबद्दल स्थानिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये चालणाऱ्या अशा अवैध प्रकारांची पोलिसांनी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

इन्स्टाग्रामवर मैत्री, व्हिडिओ कॉल अन् नंतर ब्लॅकमेलिंग!

मुंबई: सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर व्यापाऱ्याकडे सेक्सटॉशन करून साडेतीन लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार यांचे इंस्टाग्रामवर एक खाते आहे. चार महिन्यापूर्वी त्यांना इंस्टाग्रामवर एका महिलेचा मेसेज आला होता. त्या मेसेजला रिप्लाय दिल्यानंतर ते दोघे एकमेकांशी संवाद साधत असायचे. संवाद सुरु असताना महिलेने त्यांना अन्य महिला खाते धारकाबाबत माहिती देत तिच्याशी बोलण्यास सांगितले. मात्र तक्रारदार याने बोलण्यास नकार दिला. काही दिवसानंतर तक्रारदार याने त्या महिलेशी बोलण्यास होकार दिला. होकार दिल्यावर त्या महिलेच्या खात्यावरून तक्रारदारास मेसेज आला. त्यानंतर ते त्या महिलेशी चर्चा करत असायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT