मुंबई : सोशल मिडीयावर बदनामी करुन एका एअर होस्टेससह तिच्या दोन बहिणींची अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना मालवणी परिसरात घडली. याप्रकरणी या व्यक्तीविरुद्ध मालवणी पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.
तक्रारदार तरुणी ही मालाडच्या मालवणी, मढ परिसरात राहत असून ती एअर हॉस्टेस म्हणून कामाला आहे. तिच्या एका बहिणीचे लग्न झाले असून तिचा पती तिचा दारुच्या नशेत तिच्या बहिणीचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्यामुळे ती माहेरी निघून आल होती. गेल्या दोन वर्षांपासून ती त्यांच्यासोबत राहत होती. रविवारी तो त्यांच्या घरी आला आणि त्याने तक्रारदाराच्या आईला तलवारीने मारहाण केली होती.
याप्रकरणी मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल होताच तिच्या बहिणीच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मंगळवारी सायंकाळी तिच्या एका मैत्रिणीने तिला सोशल मिडीयावर तिच्यासह दोन्ही बहिणीचे काही अश्लील फोटो अपलोड झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिने तिचे सोशल अकाऊंटची पाहणी केली होती. त्यात तिच्यासह तिच्या दोन्ही बहिणीचे अज्ञात व्यक्तीने अश्लील फोटो अपलोड करुन त्यांची बदनामी केल्याचे दिसून आले. तिच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमातर्गत गुन्हा दाखल केला आहे.