

Navi Mumbai APMC Dry fruits price hike
वाशी : जीएसटीमुळे दिवाळीत स्वस्ताईचे वारे वाहत असले तरी दिवाळीत सुका मेवा आप्तेष्ठांना भेट देताना थोडा हात आखडता घ्यावा लागणार आहे. एपीएमसी मार्केटमध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने सुकामेव्याची दरात 10 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
काजू, मनुके वगळता इतर सुकामेवा हा परदेशातून आयात करावा लागतो. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरात वाढ झाली आहे.
दिवाळीत गोड खाण्याबरोबरच काही लोक सुक्या मेव्याचा पर्याय निवडतात. भेट देण्यासाठीही सुक्या मेव्याला पसंती दिली जाते. त्यानुसार बाजारात या सुक्या मेव्याचे वेगवेगळ्या आकाराचे गिफ्ट पॅकेट उपलब्ध आहेत. मात्र सुका मेव्याचे दर वाढल्याने गिप्टचे दरही वाढले आहेत. बाजारात आत्ता काजू बदाम, पिस्ता, मनुके, खारीक, अक्रोड यांचे दर गेल्यावर्षीच्या मानाने 10 ते 20 टक्क्यांनी वाढलेले आहेत.
सुकामेवा अन् चॉकलेट्सला पसंती
दिवाळीनिमित्त गिफ्ट देण्यासाठी मिठाईऐवजी ड्रायफ्रूट आणि चॉकलेट हॅम्पार्सला पसंती सुकामेव्याचे बॉक्स उपलब्ध आहेत. चॉकलेटमध्ये साधे चॉकलेट, सुकामेवा, डार्क चॉकलेट असे प्रकार उपलब्ध आहेत. ड्रायफुट गिफ्ट 320 तर चॉकलेट बॉक्स 70 रुपयांपासून उपलब्ध आहे, अशी माहिती मिठाई विक्रेते भिबीशन कुमार यांनी दिली.