Malad Gas Cylinder Blast Pudhari
मुंबई

Malad Gas Cylinder Blast |मालवणीतील गॅस सिलिंडर स्फोट: दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू, २ जणांची प्रकृती गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Gas Leakage Blast Malad Mumbai

मालाड : मालाड मालवणीतील एमएचबी कॉलनीत २७ जानेवारीरोजी सकाळी ९. २५ वाजता गॅस लिकेज मुळे झालेल्या गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटनेत मोठा अपडेट समोर आला आहे. या भीषण घटनेत जखमी झालेल्या सात जणांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आणखी दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख विजय चौधरी आणि जुलेखा खान अशी आहे. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

या स्फोटात जखमी झालेल्या उर्वरित व्यक्तींवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोन जखमींची प्रकृती गंभीर असून इतरांची प्रकृती हळूहळू स्थिर होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक तपासात गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT