मुंबई : दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या अनियंत्रित बांधकाम व पाडकामांमुळे परिसरात धुळीचे प्रदूषण वाढले आहे. यामुळे मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि डोळ्यांच्या तक्रारी वेगाने वाढू लागल्या आहेत.
पाडकामादरम्यान बांधकाम व्यावसायिकांकडून पर्यावरणीय नियमांचा सर्रास भंग होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. रिपाइंचे पर्यावरण विभागाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विजय शेट्टी यांनी महापालिका, पोलीस प्रशासनाकडे तशी तक्रार केली आहे.