knife attack Pudhari
मुंबई

Malad Crime: मालाडमध्ये किरकोळ वादातून तरुणाची हत्या; तिघे जखमी

पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली: मालाड पूर्व आप्पा पाडा रिक्षा स्टॅन्ड जवळ असलेल्या पार्किंगमध्ये बसलेल्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन चाकूने वार करत आकाश धोत्रे वय (२८) या तरुणाची हत्या करण्यात आली तर त्याला सोडवण्यासाठी आलेल्या तीन तरुणांवरही चाकू हल्ले करण्यात आले त्यामध्ये एक जण गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

७ मे रविवारी दुपारी एक वाजता महेंद्र सहानी आणि वीरेंद्र सहानी हे दोन तरुण रिक्षामध्ये बसले होते. त्या ठिकाणी आकाश धोत्रे, रमेश धोत्रे, अमित मिश्रा, लकी ठाकूर हे तरुण आले. त्यांच्यात वाद झाला. प्रकरण हाणामारीवर आले.

वीरेंद्र सहानी, महेंद्र सहानी या दोघांनी मिळून जवळील चाकू काढून आकाश धोत्रेवर चाकूने सपासप वार केले असता आकाश धोत्रे वय (२८)याचा जागीच मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी रमेश धोत्रे अमित मिश्रा, लकी ठाकूर हे गेले असता यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला त्यामध्ये रमेश धोत्रे हा गंभीर जखमी असून अमित मिश्रा, लकी ठाकूर यांच्यावर चाकू वार झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेचा निषेध म्हणून वडार समाजाच्या लोकांनी कुरार पोलीस चौकी ला घेराव घातला आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली असता पोलिसांनी वीरेंद्र सहानी आणि महेंद्र सहानी या दोघांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT