Floating Palace Mumbai pudhari photo
मुंबई

Floating Palace Mumbai : समुद्रात शाही विवाह सोहळ्यासाठी उभारला जातोय जलमहाल

तब्बल २७,००० चौरस फूटांचा तरंगता मंच!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मिलिंद कारेकर

मलबार हिलच्या पाठीमागे अरबी समुद्रात तब्बल २७ हजार चौरस फूट क्षेत्रफळात जणू जलमहाल उभारला जात असून हा महाकाय तरंगता मंच म्हणे एस्सार समूहाचे मालक असलेल्या रुईया कुटुंबातील शाही सोहळ्यासाठी उभारला जात आहे.

१९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या लग्नासाठी हा तात्पुरता तरंगता मंच उभारण्यासाठी रुईया कुटुंबाला मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोर्ट अथॉरिटी, मुंबई पोलीस, बीएमसी आणि एमसीझेडएमए यांच्याकडून सशर्त परवानग्याही देण्यात आल्याचे समजते. मात्र, पर्यावरण सचिव जयश्री भोज यांच्याशी यासंदर्भात वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.

या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमींमध्ये मात्र नाराजी आहे. सागरी जीव आणि पाण्याखालील अधिवासांचे रक्षण यात कसे होणार, असे सवाल उपस्थित होत आहेत. समुद्रात अशा भव्य रचनेला परवानगी दिल्यास धोकादायक पायंडा पडेल आणि किनारपट्टीवर राहणारी इतर श्रीमंत कुटुंबेही खासगी उत्सवांसाठी अशाच परवानग्या मागतील, अशी भीती मलबार हिल येथील समाजसेवक संजय शिर्के यांनी यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT