Uddhav Thackeray  
मुंबई

Uddhav Thackeray : "गद्दारांचा बुडबुडा फुटला, आता आपसांतच बाचाबाची" : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

भगव्यावर आता कोणतेही चिन्ह नको, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच आता दिसायला हवा

पुढारी वृत्तसेवा

Uddhav Thackeray On Mahayuti : नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्‍या रणधुमाळीत महायुतीच्या नेत्यांवर त्यांच्याच लोकांनी धाडी टाकल्या. हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा कशा नेत होत्या, हे संपूर्ण राज्‍याने पाहिले आहे. आता या 'गद्दारांचा बुडबुडा फुटला असून, त्यांच्यातच बाचाबाची सुरु झाली आहे,' अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधला."शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा आपल्याला दिसायला हवा. भगव्यावर आता कोणतेही चिन्ह नको. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच आता दिसायला हवा," असे आवाहनही त्यांनी आज (दि. ३ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना केले.

'संचार साथी' म्हणजे 'पेगासस'चे दुसरे नाव!

मागील दोन-चार वर्षांत आपण ज्या पेगासस स्पायवेअरबद्दल ऐकत होतो, त्याचे नाव बदलून आता संचार साथी ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी ते सामान्य जनतेवर पाळत ठेवत आहेत, असा आरोपही त्‍यांनी केला.

सत्ताधाऱ्यांचा घोटाळा चव्हाट्यावर

एकीकडे हे सुरू असताना, दुसरीकडे निवडणूक सुरू असताना सत्ताधारी पक्षाचीच लोकं त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा कशा नेत होत्या, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. या सर्व घोटाळ्यांमुळे आता सगळेजण जागे होत आहेत.

शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा आता दिसायला हवा

पुढील महिन्‍यात महानगरपालिका निवडणूक जाहीर होईल. शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा आपल्याला दिसायला हवा. भगव्यावर आता कोणतेही चिन्ह नको आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच आता दिसला पाहिजे," असे आवाहनही त्‍यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT