झेडपी, पं. स. निवडणुकीचे उद्या मतदान  (Pudhari Photo)
मुंबई

Maharashtra ZP Elections : झेडपी, पं. स. निवडणुकीचे उद्या मतदान

निवडणुकीत तब्बल 7 हजार 438 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी गुरुवारी प्रचार थांबला. आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत तब्बल 7 हजार 438 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

पहिल्या टप्प्यात राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. आधी 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होती, तर 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला.

या निवडणुकीत 12 जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2624 उमेदवार रिंगणात आहेत; तर पंचायत समिती सदस्यत्वासाठी 4814 उमेदवार निवडणूक लढत आहेत. या उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT