Maharashtra Weather Update pudhari photo
मुंबई

Maharashtra Weather Update : राज्यात आठवडाभर थंडी कमीच राहणार

बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीकडे आगेकूच करण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/पुणे : पूर्वेकडून येणार्‍या वाऱ्यामध्ये वाढ झाल्याने राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. नागपूरमध्ये बुधवारी (दि.२५) राज्यातील सर्वात कमी १३.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. दरम्यान, बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीकडे आगेकूच करण्याची शक्यता आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात देखील किमान तापमान वाढलेले राहणार असून, कडाक्याच्या थंडीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात तीव्र थंडी पसरली होती. उत्तर महाराष्ट्र गारठला होता. किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामान बदललेले असून, किमान तापमानात वाढ झाली आहे. १५ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान वाढले आहे.

महाराष्ट्रात २८-२९ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात अल्प कालावधीसाठी घट होऊ शकते; मात्र डिसेंबरच्या सुरुवातीला तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध शहरांत बुधवारी नोंदविलेले किमान तापमान

अहिल्यानगर २१.३, अलिबाग २६.२, छत्रपती संभाजीनगर १६.८, डहाणू १९, हर्णे २४.४, जळगाव १४.८, जेऊर १७.५, कोल्हापूर २१, महाबळेश्वर १६.५, मालेगाव १४, मोहोळ १९.५, कुलाबा २४.४, सांताक्रूझ २१.६, नांदेड १८.६, नंदुरबार १८, नाशिक १४.२, धाराशिव १६.९, पालघर १८.२, परभणी १८, रत्नागिरी २२, सांगली २१.५, सातारा १८.१, सोलापूर २१.७, अकोला १८.५, अमरावती १७.५, भंडारा १७.८, ब्रह्मपुरी १८.४, बुलढाणा १७.५, चंद्रपूर १९.६, गडचिरोली १८, गोंदिया १४.२, नागपूर १३.२, वर्धा १५.९, वाशिम १७.२, यवतमाळ १४.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT