Cyclone Kani File Photo
मुंबई

Cyclone Kani: बंगालच्या उपसागरात ‘कानी’ चक्रीवादळाची शक्यता; राज्यातील तापमानात वाढ

चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्रात उकाडा वाढला, किमान तापमानात वाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बंगालच्या उपसागरात 'कानी' नावाच्या चक्रीवादळाची तयारी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे. या बदलामुळे किमान तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवू लागला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे.

परिणामी दिवसा आणि रात्रीदेखील उकाडा जाणवत आहे. मध्यरात्री ते पहाटेपर्यंतच थंडीचा कडाका काही भागात जाणवत आहे.

बंगालच्या उपसागरात कानी नावाचे चक्रीवादळ तयार होत असून, शनिवारी (दि. २८) कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

राज्याचे शुक्रवारचे किमान तापमान

नागपूर १३.४, मुंबई २३.२, रत्नागिरी २२.८, पुणे १७.१, अहिल्यानगर १९.३, जळगाव १६.२, कोल्हापूर २२, महाबळेश्वर १७.४, मालेगाव १४.६, नाशिक १४.१, सांगली २१.६, सातारा २०, सोलापूर २३.३, धाराशिव १८, छत्रपती संभाजीनगर १८.८, परभणी १८.४, नांदेड १९.५.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT