Maharashtra blood bank inspection Pudhari
मुंबई

Maharashtra blood bank inspection: राज्यातील ब्लड बँकांची होणार तपासणी; एसबीटीसीचे निर्देश

तपासणीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी ब्लड बँकांची तपासणी केली जाणार आहे. स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल (एसबीटीसी) ने यासंदर्भात सर्व जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना निर्देश जारी केले आहेत. तपासणीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

एसबीटीसीच्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ब्लड बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानंतर जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी, पॅथॉलॉजिस्ट आणि रक्त संक्रमण सेवा तज्ज्ञांकडून विविध जिल्ह्यांतील ब्लड बँकांची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. आता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्याने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी तपासणीची व्याप्ती वाढविण्यात आली असून पूर्वीच्या तपासणी यादीतील 27 मुद्द्यांऐवजी आता 44 मुद्द्यांवर पडताळणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान ब्लड बँकांमध्ये आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध आहे का, पुरेसे कर्मचारी आहेत का, कामकाजाची पद्धत कशी आहे.

रक्तासाठी किती शुल्क आकारले जाते, तसेच थॅलेसेमियासह अन्य रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो का, याची तपासणी केली जाणार आहे. ही मोहीम शासकीय, खासगी, सार्वजनिक ट्रस्ट, इंडियन रेड क्रॉस सोसायटी तसेच महापालिकांकडून चालविल्या जाणाऱ्या सर्व ब्लड बँकांमध्ये राबविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT