Weather Update Pudhari
मुंबई

Weather Update: अवकाळीचा जोर ओसरताच राज्यभरात पुन्हा उकाडा सुरू

अकोला येथे शुक्रवारी 40.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गारपीट आणि पावसामुळे पाच ते सात अंशांनी खाली आला होता. मात्र, अवकाळीचे सावट संपताच 10 एप्रिलपासून पाऱ्याने उसळी घेतली आहे. अकोला येथे शुक्रवारी 40.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

एप्रिल महिन्याची सुरुवात जोरदार गारपीट व पावसाने झाली होती. त्यामुळे कमाल तापमान 42 वरून 32 ते 35 अंशांवर खाली आले होते. वातावरणात आर्द्रता, जमिनीत ओलावा आणि ढगाळ वातावरणामुळे असे वातावरण 9 एप्रिलपर्यंत होते. मात्र, शुक्रवारपासून वातावरणात कमालीचा उकाडा पुन्हा जाणवू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT