मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित ‘भारत रिन्यूबल एनर्जी समिट अँड एक्‍स्‍पो २०२६’ला उपस्थित ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सोलर अलायन्सचे महासंचालक आशिष खन्‍ना आदी.  pudhari photo
मुंबई

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 : मार्चअखेर कृषिपंपांना मिळणार शंभर टक्के दिवसा वीज

‘महावितरण’चे अध्यक्ष लोकेश चंद्र यांची माहिती; राज्यात ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या बळावर राज्यात आता ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. आगामी मार्चअखेर १०० टक्के कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

नवी दिल्ली येथे ‘भारत रिन्यूबल एनर्जी समिट अँड एक्‍स्‍पो २०२६’ या केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चासत्रात लोकेश चंद्र बोलत होते. ‘डिस्ट्रीब्यूटेड एनर्जी फॉर एनर्जी सिक्युरिटी, सेल्फ रिलायन्स अँड विकसित भारत २०४७’ या चर्चासत्रात त्यांनी महाराष्ट्राने विकेंद्रित स्वरूपात सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभे करून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी कशी कामगिरी केली आहे, हे स्पष्ट केले. या चर्चासत्रात पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर यांचे मुख्य भाषण झाले.

इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेम्ब्ली‍च्या नवव्या सत्रात आयोजित ‘पंप्स टू प्रोग्राम्स : स्केलिंग सोलरायझेशन ऑफ ॲग्रीकल्चर इन द ग्लोबल साऊथ’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजना यांची यशोगाथा आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर मांडली. सोलर अलायन्सचे महासंचालक आशिष खन्‍ना यांनी यावेळी लोकेश चंद्र यांच्याशी संवाद साधला.

  • महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना ही ‘पीएम कुसुम’ या केंद्राच्या योजनेच्या आधारे सुरू करण्यात आली असून, या योजनेत १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे ७ हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शंभर टक्के कृषिपंपांना दिवसा सौरऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते मार्चअखेर पूर्ण होईल, अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT