मुंबई: राज्यात पाऊस वाढण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांना मुसळधारेचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. याचा अर्थ संततधार सुरू असलेल्या महामुंबई प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
गत २४ तासांत कोकणात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला आहे. राज्यात २४ जुलैपर्यंत पावसाचा जोर राहील. विदर्भात पाऊस वाढणार आहे, तर मराठवाड्यात मात्र कमी पावसाचा अंदाज आहे.
गेल्या २४ तासांत कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात दमदार, तर मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. राज्यात असाच पाऊस २४ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
कोकणसह घाटमाथ्यावर २६ जुलैपर्यंत मुसळधार, मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ रोजी मुसळधार, तर मराठवाड्यात तुरळक पावासाचा अंदाज आहे. विदर्भात २२ ते २६ दरम्यान पाऊस वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.