राज्यातील 21 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या  pudhari photo
मुंबई

Maharashtra police transfers : राज्यातील 21 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मुंबई शहर उपायुक्तपदी नियुक्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाने राज्यातील 21 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचा अध्यादेश काढला. बाळासाहेब पाटील, संदीप घुगे, अनुराग जैन, गजानन राजमाने या अधिकाऱ्यांची मुंबई शहर येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

राज्यातील भारतीय पोलिस आणि राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्याच्या बदलीबाबत गृह विभागाने आदेश काढला. जालन्याचे पोलिस अधीक्षक अजय बन्सल याची पोलिस अधीक्षक महाराष्ट्र सायबर, अमरावती (ग्रामीण)च्या अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद याची पोलिस अधीक्षक धुळे, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील याची मुंबई शहर उपायुक्त पदी बदली करण्यात आली.

त्याचप्रमाणे अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे याची सहायक पोलिस महानिरीक्षक (नि व स) पोलिस महासंचालक कार्यालय, परभणीचे अधीक्षक रवींद्र सिंह यांची पोलिस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, तर राज्य गुप्तवार्ता विभागाचे संदीप घुगे याची पोलिस उपायुक्त मुंबई शहर येथे बदली झाली आहे.

नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त याची अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती ) आणि सहायक पोलिस महानिरीक्षक आस्थापना स्टाफ अधिकारी, चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन याची पोलिस अधीक्षक अहिल्यानगर, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांची पोलिस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) येथे, वाशिमचे पोलिस अधीक्षक अनुज तारे यांची पोलिस अधीक्षक अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स पुणे येथे, नागरी हक्क संरक्षणचे पोलिस उपायुक्त अनुराग जैन यांची पोलिस उपायुक्त मुंबई शहर, पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे अश्विनी सानप याची पोलिस अधीक्षक नंदुरबार, अप्पर पोलिस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांची पोलिस अधीक्षक जालना, पुणे शहर पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे, पोलिस अधीक्षक अमली पदार्थ टास्क फोर्स पुणे निकेश खाटमोडे यांची पोलिस अधीक्षक वाशिम, अप्पर पोलिस अधीक्षक जालना आयुष नोपानी यांची पोलिस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीणचे पंकज कुमावत यांची पोलिस अधीक्षक परभणी, नागपूर पोलिस उपायुक्त परिमंडळ 5 चे निकेतन कदम यांची पोलिस अधीक्षक अमरावती (ग्रामीण), अप्पर पोलिस अधीक्षक परभणी सूरज गुंजाल यांची अप्पर पोलिस अधीक्षक मालेगाव, पोलिस अधीक्षक फोर्स वन गजानन राजमाने याची पोलिस उपायुक्त मुंबई शहर आणि अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती) पोलिस महासंचालक कार्यालय दत्ता तोडेवाड यांची अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती येथे बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT