ACP Transfer Orders (File Photo)
मुंबई

Maharashtra Police News | राज्य पोलीस दलातील 11 एसीपींच्या बदल्या

ACP Transfer Orders | राज्य पोलीस दलातील अकरा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Police Transfers

मुंबई : राज्य पोलीस दलातील अकरा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले. त्यात दहा अधिकार्‍यांची मुंबईत तर एका अधिकार्‍याची बदली दाखविण्यात आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी गृहविभागाचे अवर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी या अकरा पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. त्यात खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपअधीक्षक संजय दामोदर डहाके, नाशिक गुन्हे शाखेच्या प्रशिक्षण केंद्राचे महेश नारायण मुगुटराव, पुण्याच्या महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश प्रल्हाद पालवे, रायगडच्या महामार्ग पथकाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योत्स्ना विलास रासम, ठाण्याच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक कल्पना यशवंत गाडेकर, छत्रपती संभाजीनगर, मनमाड लोहमार्ग उपविभागाचे सूर्यकांत गणपत बांगर, कोल्हापूर मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक मृत्युंजय धानय्या हिरेमठ, नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षकाचे वाचक रेणुका शंभुराज बुवा (होनप), नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभाग, कोकण भवनचे अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शंकर माने, नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सुहास पांडुरंग कांबळे यांची मुंबईत बदली दाखविण्यात आली आहे तर मुंबईचे एकमेव सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज बाबूराव खंडाळे यांची नाशिकच्या गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT