Chandrashekhar Bawankule Pudhari
मुंबई

New sub divisional offices maharashtra : चार अपर जिल्हाधिकाऱ्यांसह ४७ नवीन अपर तहसील कार्यालये : महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी महसूलमंत्र्यांचे मोठे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सर्वसामान्य व ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा, जलद గतीने महसुली सेवांचा लाभ तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या સૂचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ४७ नवीन अपर तहसील कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ४ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयेही स्थापन केली जाणार आहेत.

शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा वाढता व्याप, उपलब्ध अपुरा अधिकारी व कर्मचारीवृंद, तालुक्यांचे व जिल्ह्यांचे भौगोलिक अंतर, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागासह राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला विविध दाखले, जमिनीचे फेरफार, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय सेवा घरपोच व वेळेत मिळण्यास या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार आहे.

नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये

  • पुणे - बारामती, सोलापूर-पंढरपूर, रत्नागिरी-दापोली, नागपूर-नागपूर (ग्रामीण).

राज्यातील नवीन अपर तहसीलदार कार्यालय

  • कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे.

  • सातारा : फलटण व कऱ्हाड तालुक्यातील अनुक्रमे साखरवाडी व उंब्रज.

  • पुणे : खेड तालुक्यातील चाकण.

  • नांदेड : हदगाव, मुखेड व किनवट तालुक्यातील अनुक्रमे तामसा, मुक्रमाबाद व इस्लापूर.

  • लातूर : लातूर तालुक्यातील मुरूड बुद्रुक.

  • परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा.

  • जालना : जालना तालुक्यातील नेर.

  • बीड : बीड व आष्टी तालुक्यातील अनुक्रमे नेकनूर व कडा.

  • छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा.

  • अहिल्यानगर : अकोले व नेवासा तालुक्यातील अनुक्रमे राजूर व घोडेगाव.

  • नाशिक : बागलाण तालुक्यातील नामपूर.

  • पालघर : डहाणू, वसई व पालघर तालुक्यातील अनुक्रमे कासा, विरार व बोईसर.

  • मुंबई उपनगर जिल्हा : कुर्ला, बोरीवली व अंधेरी तालुक्‍यातील अनुक्रमे चेंबूर, मालाड व वांद्रे.

    गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यांचाही यामध्ये समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT